शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वरोरा-भद्रावती विधानसभा मध्यवर्ती कार्यालय, शहीद चौक येथील शिवालय वरोरा येथे आदिवासी समाजक्रांतीचे जनक व थोर स्वातंत्रसेनानी भगवान बिरसा मुंडा यांची आज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. शिवसेनेचे वरोरा येथील मध्यवर्ती कार्यालय “शिवालय” येथे त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पन व पुजन करुन श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी 75-वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र श्रीनिवासराव शिंदे, वरोरा तालुका प्रमुख दत्ताभाऊ बोरेकर, विधानसभा समन्वयक वैभवभाऊ डहाणे, वरोरा युवा सेना प्रमुख प्रज्वल जानवे, उपशहर प्रमुख संजय नरोले व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.