कारंजा येथे शुक्रवारी झाला अतिमुसळधार पाऊस ; जनजीवन झाले त्रस्त.
वाशिम : हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या हवेचे क्षेत्र निर्माण झाले आहे.त्यातच वारंवार चक्रीवादळे धडकत आहेत.शिवाय परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून, आता राज्यात काही ठिकाणी, काही भागात गडगडाटी,वादळी, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भासाठी दि.१२ ते १५ सप्टेंबर २०२५ मुसळधार सांगण्यात आला होता. त्यानुसार विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. दि १२ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ५:०० वाजताचे दरम्यान कारंजा मानोरा तालुक्यात परत एकदा ढगफुटी सदृश्य अतिमुसळधार अतिवृष्टी झाली असून, परत रात्री तसेच दि. १३ ते १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत रात्रंदिवस, काळ वेळ बदलून पाऊस होण्याची शक्यता असून, त्यापुढेही सप्टेंबर अखेर पर्यंत ऊन सावली प्रमाणे पावसाचे प्रमाण राहणारच आहे. ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी पावसा विषयी आधिक माहिती देतांना सांगीतले की, संपूर्ण पितृपक्षात भाग बदलवून कमी जास्त किंवा बारिक सारीख रिमझीम पाऊस होणार असून काही ठिकाण भर उन्हात शिंतोडे पडणार आहेत.काही भागात नदी नाल्यांना पूर येणार असून, धरणातून विसर्ग केल्या जाणार आहे.शिवाय अनेक ठिकाणी विजा पडण्याच्या घटना घडण्याची शक्यता आहे.त्यामुळे या काळात शेतकरी व ग्रामस्थांनी आपली,कुटुंबाची,गुराढोरांची व घरादाराची काळजी घेण्याची गरज आहे. पुढे बोलतांना त्यांनी सांगीतले की, सध्या जोरदार पाऊस पडत असूनही, हवेतील उष्णता वाढत असून,श्रमिकांचे अंगातून घामाच्या धारा वहात आहेत.थंडीची सुरुवात पुढील ऑक्टोंबरच्या मध्या शिवाय होणार नसल्याचेही त्यांनी कळवीले आहे.या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांचे मत जाणून घेतले असता त्यांनीही करंजमहात्म्यच्या पावसाच्या अंदाजाला दुजोरा दिला आहे.