कारंजा (लाड) : श्री.संत गजानन महाराजांचा ११५ व्या समाधी सोहळ्या निमित्त,गुरुवार दि २८ ऑगष्ट २०२५ रोजी एक दोन नव्हे तर तब्बल ११५ व्या वर्षांनीच गुरुवार दिवशी पुण्यतीथी येण्याचा सुवर्णमय अमृतयोग आला.त्यानिमित्त निष्काम कर्मयोगी ज्येष्ठ सेवाधारी सुरेशराव ठाकरे गुरुजी यांच्या मार्गदर्शनात प्रातःकाली सुरोशे दाम्पत्याकडून श्रींच्या मुर्तीचा दुग्धाभिषेक करण्यात येवून मंदिराचे पुजारी वेदशास्त्र संपन्न पुरोहित महेश महाराज पांढरकर यांच्या मंत्रोच्चाराद्वारे पूजन,हारार्पण व प्रातः कालीन महाआरती घेण्यात आली.तर दुपारी १२ वाजता कारंजा शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यतत्पर आणि लोकप्रिय पोलीस निरीक्षक तथा ठाणेदार श्री दिनेशचंद्र शुक्ला साहेबांचे हस्ते श्रींची महाआरती घेण्यात येवून मंदिराचे प्रांगणात भव्य असा महाप्रसाद संपन्न झाला. यावेळी स्वतः ठाणेदार शुक्ला यांनी महाप्रसादाचे वितरण करून शुभारंभ केला. संत गजानन महाराजांचे शेकडो स्वयंसेवक,सेवाधारी प्रसादाचे वितरण करीत होते. कारंजा शहरातील हजारो भाविकांनी शांतता, संयम, शिस्तीने प्रसादाचा लाभ घेतला.कार्यक्रमा करीता मंदिराचे सेवाधारी निष्काम कर्मयोगी सुरेशराव ठाकरे गुरुजी,गजाननराव कडू, पुणेवार, मिंटूभाऊ सांगानी,बिपीन वाणी, किशोर पाटील बाक्कल, हरिभक्त परायण दिगंबर महाराज महाजन,साहेबराव पापडे, संजय कडोळे, नवघरे काका, राजुभाऊ असलमोल,गजानन सोळंके, किरण सावके, आदींनी स्वयंसेवा दिली. दुपारी ०४:०० वाजता कार्यक्रम संपल्या नंतर कारंजा शहरात ढगफुटी होऊन प्रचंड पाऊस कोसळला. मात्र सुरेशराव ठाकरे व सेवाधाऱ्याच्या योग्य नियोजनाने कार्यक्रम हर्षोल्हासात पार पाडला . या कार्यक्रमासाठी सेवाधारी संजय मधुकरराव कडोळे (पत्रकार) यांचे हस्ते मागील गुरुवार दि.२१ ऑगस्ट रोजी श्रींचा अभिषेक होऊन तिर्थ स्थापन करण्यात आले.तर श्रींचे तिर्थ कलश विसर्जन त्यांचेच हस्ते दि. २८ ऑगस्ट ऋषीपंचमी रोजी करण्यात आले.