अकोला - स्थानिक श्री संताजी इं. प्रायमरी स्कुल व विद्या भारती यांच्या संयुक्त उपक्रमाने आज दि. 30-10-23 रोजी पालकांसाठी समुपदेशाचा कार्यक्रम आला होता.
समर्थ शिशु वाटीकेतील वर्ग नर्सरी ते kg II च्या सर्व पालकांनी यासाठी भरघोस प्रतिसाद दिला आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन श्री सदाशिवजी उपाख्य भाईजी उपाले, शिशुवाटीका प्रमुख, महाराष्ट्र, गोवा संघ प्रचारक, सौ गिरिजा कानडे शिशुवाटीका जिल्हा प्रमुख, श्री गिरिशजी कानडे शिशुवाटीका प्रमुख, निलेशजी चरपे पश्चिम विदर्भ सेवाकार्य, शाळेचे अध्यक्ष श्री मंगेशजी वानखडे सर उपस्थित होते. दिप प्रज्वलीत करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी श्री सदाशिवजी उपाख्य भाईजी यांनी शिशु अवस्थेतील मुलांची दैनंदिनी कशी असावी ते स्पष्ट केले. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची झोप, जेवण याला प्राधान्य देण्यात यावे मुलांच्या शारिरिक व मानसीक अवस्थेचा विचार व्हावा. मुलांसाठी पालकांना आपला वेळ देणे गरजेचे आहे. त्यांना मिळणारा आहार कसा असावा. त्यांच्या शारिरिक व मानसिक विकासावर मुलांचे भवितव्य अवलंबुन असते. त्यांना स्पर्धेमध्ये न पाहता त्यांना आनयंददायी शिक्षण कशा पध्दतीने देण्यात येईल यांचा विचार झाला पाहिजे सहज, सोपे दृष्टांन्त देत भाईजींनी श्रोतावर्ग खीळवून ठेवला होता.
शिशुवाटीकेच्या निमित्याने त्यांनी केलेले हे मार्गदर्शन सर्वच स्तरातील विद्यार्थ्यांच्या पालकांना मोलाचे होते. आजचे विद्यार्थी हे समाजाचा एक महत्वाचा घटक आहे आणी त्यांची घडवणुक ही योग्य प्रकारेच झाली पाहिजे तरच उद्याचा जागरुक सशक्त नागरिक तयार होईल असे त्यांनी सांगितले. शिक्षणाला व्यक्तीच्या जिवनात अनन्यसाधारन महत्व आहे परंतु शिशु अवस्थेतील मुलांना देण्यात येणारे शिक्षण हे आनंददायी असणे आवश्यक आहे. मातृशक्तीने याविषय जागरुक व्हावे. व आपल्या पाल्याच्या विकासात मोलाची भर टाकावी असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी शाळेचा पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. कार्यक्रमाचे संचलन व परिचय कु. वर्षा येन्नेवार मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे सर्वेसर्वा श्री मंगेशजी वानखडे यांनी केले.