वाशिम : सर्व धर्मियांमध्ये ज्येष्ठ नागरीक ६० वर्ष किंवा त्यापेक्षा अधीक वयाचे आहेत, त्यांना भारतातील तीर्थ क्षेत्राच्या भेटी देण्याची इच्छा पुर्ण करण्याकरिता मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. सदर
योजनेचा लाभ जास्तीत जास्त जेष्ठ नागरीकांना होण्या हेतुने ८ ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयानुसार निकष शिथील करण्यात आले आहे. सदर योजनेचा लाभ मिळण्याकरिता आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.
• सक्षम प्राधीकारी यांनी दिलेला २.५० लखापर्यंत उत्पन्न प्रमाणपत्र किंवा अंत्योदय अन्न योजना / प्राध्यान्य कुटूंब योजना (PHH) / वार्षिक उत्पन्न रूपये २.५० लाखाच्या आत असलेले मात्र प्राधान्य कुटुंब
नसलेले (NPH) शिधापत्रीकाधारक
• जर पती-पत्नीने स्वतंत्रपणे अर्ज केला असेल आणि एकाची लॉटरीत निवड झाली असेल आणि दुसऱ्या
जोडीदाराची लॉटरीत निवड झाली नसेल, तर जिल्हास्तरीय समिती त्यांना किंवा तीला यात्रेवर पाठविण्याचा
निर्णय घेऊ शकतात.
• सदर योजनेसाठी पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. परंतु दिनांक ३१
ऑक्टोंबर २०२४ पुर्वी ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर करू शकतात.
७५ वर्षावरील अर्जदाराच्या जीवन साथी किंवा सहाय्यक यांचे वय ६० वर्षापेक्षा कमी असले तरी जीवनसाथी किंवा सहाय्यक यापैकी एक अर्जदारासोबत प्रवार करू शकतात. परंतु सहाय्यकाचे किमान वय वर्ष २१ ते कमाल वय ५० वर्ष असावे. सहाय्याने शारिरीकदृष्टया निरोगी आणि प्रवासासाठी तंदुरूस्त असल्याचे वैद्यकिय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे