अचलपूर :- तक्रारदार यांचा क्रमांक एम एच 27 बी एक्स 49 37 रेतीने भरलेला ट्रक लोकसेवक नायब तहसीलदार श्री शंकर महादेवराव श्रीराव वर्ग 2 यांनी 202-10-2022 रोजी स्थानिक महालक्ष्मी काट्याजवळ थांबविला व सदर ट्रक व कार्यवाही न करण्यासाठी नायब तहसीलदार यांनी तक्रारदार यांना 20 हजार लाचेची मागणी केली , मागितलेली रक्कम नंतर आणून देण्याचं अटीवर ट्रक सोडण्यात आला.
सदर तक्रारीचा अनुषंगाने 17-10-2022 रोजी पंचासमक्ष केलेल्या कारवाई दरम्यान आलोसे नायब तहसीलदार श्री शंकर महादेवराव श्रीराव वर्ग 2 अचलपूर तहसील यांनी तक्रारदार यांचे कडून लाचेची 18000 रक्कम नायब तहसीलदार यांचे न्यायालय कक्षेमध्ये तहसील कार्यालयात पंचासमक्ष स्वीकारली तदनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे
कारवाई मार्गदर्शन:-
मा. श्री. विशाल गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती.
1)श्री.अरुण सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.अमरावती परिक्षेत्र, अमरावती.
2)श्री. देविदास घेवारे, अप्पर पोलिस अधीक्षक, ला.प्र.वि.अमरावती परिक्षेत्र, अमरावती.
3) श्री संजय महाजन, पोलीस उपअधीक्षक, अमरावती घटक, अमरावती,
4) श्री शिवलाल भगत, पोलीस उपअधीक्षक, अमरावती घटक, अमरावती,
सापळा व तपास अधिकारी– पो. नि. प्रवीण पाटील ,ला.प्र.वी.अमरावती
सदरची कार्यवाही पथक पो.नि प्रविणकुमार पाटील, पो.नि अमोल कडू, पो.नि केतन मांजरे, पो.ना राहुल वंजारी ,पो.ना विनोद कुंजाम, पो.कॉं शैलेश कडू ,चालक पो.उप निरीक्षक सतीश किटूकले यांनी केली आहे
आपल्या प्रतिक्रिया द्या....