नागभिड-- नागभीड येथे रेल्वे ग्राउंड वर अनंत श्री विभूषित जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्र चार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुका दर्शनाचा सोहळा मोठ्या थाटामाटात दिनांक 27/5/2022रोज शुक्रवार ला संपन्न झाला यासाठी रेल्वेच्या ग्राउंडवर भव्य मंडप उभारण्यात आला होता परमपूज्य स्वामीजींच्या सिद्ध पादुका शहरातून भव्य मिरवणुकीने कार्यक्रम स्थळी आणण्यात आले या शोभायात्रेत भाविकांची हजारोच्या संख्येत प्रचंड गर्दी उसळली होती शोभायात्रेत बँड पथक, ढोल ताशे ,लेझीम पथक ,रथावर स्वामीजींच्या सिद्ध पादुका, विविध प्रकारचे वाघ, आदिवासी नृत्य, राजस्थानी, गुजराती नृत्य, भजन दिंडी, घोड्यावर स्वार शिवाजी महाराज ,झाशीची राणी विविध संत महतांचे भगवे झेंडे धारी महिला व पुरुष पथक, कलश धारी महिला गुढी पकडलेल्या महिला विविध प्रकारच्या झाकी व डिजे इत्यादी शोभायात्रेमध्ये सामील होते
कार्यक्रम स्थळी सिद्ध पादुकाचे आगमन झाल्या नंतर सर्व भक्तांना द्वारे त्यांचे पूजन करण्यात आले कार्यक्रम स्थळी सामाजिक उपक्रम मध्ये गरजू महिलांना 21 शिलाई मशीन व गरीब शेतकऱ्यांना 50 फवारणी पंपाचे वाटप येथील आमदार श्री बंटी भाऊ भांगडीया व पाहुण्यांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले, याठिकाणी 798 भाविकभक्तांना उपासक दीक्षा देण्यात आली त्यानंतर प्रवचन व भव्य महाआरती करण्यात आली कार्यक्रम स्थळी सर्व भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने जिल्ह्यातील व लगतच्या जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते,
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पीठ समिती, चंद्रपूर जिल्ह्याचे सर्व जिल्हा कमिटी , सर्व युवा , महिला सर्व तालुका कमिटी, सेवा केंद्र कमिटी, तसेच नागभीड तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी खूप मेहनत घेऊन शिस्तबद्ध कार्यक्रम यशस्वी केला,