ब्रम्हपुरी शहरात निविधा जनसेवा निधी लिमिटेड बँक मागील दोन वर्षांपासून जनतेच्या सेवेत निरंतर कार्यरत आहे. बँकेशी व्यवहार करणाऱ्या कर्जधारकांना त्यांच्या गरजेनुसार कर्ज दिले जाते. अशा कर्जधारकांना भविष्यात जीवनाची सुरक्षितता देण्याच्या अनुषंगाने बँकेच्या वतीने त्या लाभार्थ्यांचा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीतर्फे विमा काढला जातो. कर्जधारकांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला विम्याची रक्कम देण्यात येते.
अशातच निविधा जनसेवा निधी लिमिटेड या बँकेतून मयूर विलास गेडामयांनी कर्ज घेतले होते. मात्र त्यांचे अपघाती निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले.
त्यांच्या निधनाची माहिती मिळताच सदर बँकेच्या संचालक मंडळांनी तात्पुरता व प्रामाणिकता दाखवीत अपघातग्रस्त कुटुंबीयांशी संपर्क साधून बँकेच्या कार्यालयात मयूर गेडाम यांच्या आईला बँकेचे संचालक नरेश रामटेके यांच्या हस्ते एक लाख बारा हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.
मृतकाची आई गीता गेडाम यांना धनादेश प्रदान करण्यात आला. बँकेच्या प्रामाणिक प्रयत्नांबद्दल निविधा जनसेवा निधी लिमिटेड बँकेचे संचालक डॉ. देवेश कांबळे, सचिन सुखदेवे, विश्वास तिवाडे, प्रफुल्ल फुलझेले, अरुण रामटेके, संदीप दिवे, मोहम्मद गाजी अब्दुल गफार शेख, संध्या सोनटक्के आदींनी स्वागत केले आहे.