लाखनी तालुक्यातील रेंगेपार / कोहळी येथे विषारी औषध प्राशन केल्याने ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना काल सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मिथुन भगवान राऊत (३५) रा. रेंगेपार / कोहळी असे मृताचे नाव आहे. मिथुन याने १२ जुलै रोजी उंदीर मारण्याचे विषारी औषध प्राशन केल्याचे कुटुंबीयांचे निदर्शनास आल्याने त्याला भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार करून घरी परत आल्यावर त्याचा मृत्यू झाला. भगवान राऊत यांनी लाखनी पोलिसात तक्रार दाखल केली. तपास लाखनी पोलिस करीत आहेत.