मुलचेरा पोलीस ठाणे कडे जाणारे एक टाटा इंडिका वाहन क्रमांक MH 40 BG0191 यामधून अवैधरित्या दारू घेऊन जात असल्याची माहिती बातमीदाराकडून मिळाली असून सदर वाहनास थांबून वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये 20 पेटी देशी दारू मिळून आल्याने इसम शैलेश हरीदास रापल्लीवार रा. गडचिरोली, अनिकेत अरविंद कोहोपरे रा. ब्रम्हपुरी, प्रसिक कैलास लांडे रा. गडचिरोली यांना ताब्यात घेऊन गुन्हा करण्यात आला आहे.