दरवर्षीप्रमाणे 10वीमध्ये 80% गुण प्राप्त व 12वीमध्ये 75% गुण प्राप्त विद्यार्थ्यांचा तसेच इतर विशिष्ट गुणवत्ता प्राप्त गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.पावसाचे सावट असतांना जिल्हाभरातुन समाज बांधवांची भरगच्च उपस्थिती होती.
प्रमुख पाहुणे म्हणून मा.राहुलजी वाढई, साॅफ्टवेअर इंजि. मिहान नागपूर (IT क्षेत्रात जाॅबची संधी असुन इंग्रजी भाषेचे ज्ञान अवगत करण्याचे आवाहन केले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले रुपेश मोहुर्ले, बँक आॅफ इंडिया मॅनेजर चामोर्शी (सर्वांगिण व्यक्तिमत्व विकासासाठी mob चा योग्य वापर, sport मध्ये सहभाग, रोज वर्तमानपत्र वाचन करण्याचे आवाहन केले.
प्रमुख मार्गदर्शक - डाॅ. सारंग कोटरंगे, सा.रु.गड (जाॅबसाठी कुठलही एक क्षेत्र निवडुन त्यावर फोकस करावा. धरसोडवृत्तीने अपयश येते असे मार्मिक मार्गदर्शन केले.
प्रमुख मार्गदर्शक - अभिजीत मोहुर्ले AIM संचालक(आवडीच्या क्षेत्रात यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते म्हणुन पालकांनी पाल्यांवर एखाद्या क्षेत्रात जाण्याची सक्ती करु नये. आॅनलाईन माहितीची शहनिशा करायला शिका असे आवाहन केलें.
अध्यक्ष - मा.फुलचंदजी गुरनुले, अध्यक्ष जि.मा.सं.गड (कुठल्याही कामाची मनापासुन तयारी करुन सतत प्रयत्नशील राहणे.
उद्घाटक - मा.पुरुषोत्तम निकोडे, सल्लागार जि.मा.सं.गड (गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या विद्वतेचा वापर पुढे चालुन समाजासाठी करण्याचे आवाहन केले)