मुख्यमंत्री कार्यालयामधून, अमोलभाऊ पाटणकरांचा फोन येताच,जिल्ह्यातील यंत्रणा लागली कामाला.
वाशिम : सन २०२४-२५ च्या आर्थिक वर्षातील प्रलंबीत असलेल्या,वृद्ध साहित्यीक कलाकारांची निवड यादी जाहीर करून त्यांना मानधन मंजूरी मिळावी.याकरीता विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी पुढाकार घेऊन थेट मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांचे कडेच तक्रार करून नवा इतिहास घडवीला असून,अखेर मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटणकर यांनी जिल्हाधिकारी यांचेशी भ्रमणध्वनीवर संवाद साधल्याने, सन २०२४-२५ ची लाभार्थी यादी एक दोन दिवसातच मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यीक कलाकार मानधन योजने अंतर्गत, वयोवृद्ध गरजू कलाकारांनी नियमांची पूर्वता करून, जिल्ह्यातील पंचायत समित्यांमार्फत,मागील वर्षी इ.सन २०२२-२३ व २०२३-२४ मध्ये आपले प्रस्ताव सादर केले होते. त्या इच्छुक मानधन लाभार्थी कलाकारांना संबधीत जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाने,सहाय्यक उपायुक्त समाज कल्याण कार्यालय सभागृहात बोलवून त्यांचे सादरीकरण व प्रत्यक्ष मुलाखती घेवून त्यांची निवड यादी तयार केलेलीली होती.परंतु या प्रक्रियेला नऊ दहा महिने कालावधी उलटूनही अद्याप पर्यंत,संबंधित प्रशासकिय अधिकाऱ्यांकडून मंजूरातच न मिळाल्याने सदर प्रस्ताव, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबईकडे न जाता लालफितशाहीत अडकून पडल्याचे वास्तव होते.त्यामुळे सदरहू प्रस्तावाला मंजूरी मिळावी यासाठी अखेर विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी पुढाकार घेऊन जिल्हाधिकारी मॅडम यांना प्रत्यक्ष भेटून वस्तुस्थितीची कल्पना दिली. शिवाय थेट ना.देवेन्द्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांचे कार्यालयाकडे तक्रार करून,त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोलभाऊ पाटणकर यांच्या वस्तुस्थिती लक्षात आणून दिली.अखेर महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कलावंत तथा विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांच्या विनम्रतेच्या मागणीवरून,जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले मुख्यमंत्र्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोलभाऊ पाटणकर यांनी वाशिम जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांचेशी भ्रमणध्वनीवरून वार्तालाप करीत,जिल्ह्यातील कलावंताच्या मानधन लाभार्थ्यांची यादी लवकरात लवकर जाहिर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्याना सांगीतल्यामुळे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी या मागणीकडे गांभिर्याने लक्ष देवून संबंधित विभागाला,प्रलंबीत यादीची दोन दिवसात पूर्तता करून पात्र लाभार्थ्याची नावे सांस्कृतिक कार्य महासंचालनालयाकडे पाठविण्याचे आदेशच दिल्याचे विश्वसनीय वृत्त मिळाले असून, त्यामुळे संबधीत यंत्रणा वेगाने कामाला लागल्यामुळे चालू आठवड्यात सन २०२४-२५ च्या मानधन लाभार्थ्यांचा मानधन मंजूरीचा प्रश्न जवळजवळ निकाली लागलेला आहे.त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांना ०१ सप्टेंबर २०२५ पर्यंत थेट हस्तांतरण प्रणाली ( डी.बी.टी.) द्वारे मानधन मिळणार असल्याचे विलोसचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.