लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा मुंबई मेळावा संपन्न..ईतर पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमाध्यक्ष म्हणून नवा निर्णय!
अकोला* - अकोला आणि संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या सातत्यपूर्ण उपक्रम व पत्रकार तथा सामाजिक प्रश्नांची दखल घेण्याच्या संवेदनशील वाटचालीमुळे नवे अनेक पत्रकार लोकस्वातंत्र्यमध्ये दाखल होत आहेत. महाराष्ट्रभर साधलेल्या व्यापक संघटनामुळे लोकस्वातंत्र्यच्या विविध मागण्यांची शासनाकडून दखल घेतली जात आहे.हा प्रतिसाद लक्षात घेऊन महाराष्ट्रभर आणि पाच राज्यात प्रवेश करणाऱ्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाला अधिक मजबूत करण्यासाठी पदाधिकारी आणि सभासदांनी आपल्या कामाची गती वाढवावी असे आवाहन संघटनेचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी यावेळी दिली.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ७ वा विचारमंथन मेळावा प्रभादेवी मुंबई येथे संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.ईतर पदाधिकाऱ्यांना संधीच्या नव्या निर्णयानुसार मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र संघटन प्रमुख अरविंदराव देशमुख ,नागपूर हे होते.त्यांनी सुध्दा संघटना. अधिक बळकट करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले. राष्ट्रीय पदाधिकारी,शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे,कोकण प्रभारी व पालघर जिल्हाध्यक्ष जगदिशप्रसाद करोतिया,ठाणे जिल्हा संघटक संजय सोळंके यांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती.अध्यक्ष व प्रमुख उपस्थितांची यावेळी स्वागतं करण्यात आली.
याप्रसंगी लोकस्वातंत्र्यचे सामाजिक अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगे बाबा यांना अभिवादन करण्यात येऊन शहिद जवान, आत्महत्त्याग्रस्त शेतकरी,आपत्ती व अपघातांमधील बळी व दिवंगत पत्रकारांना श्रध्दांजली वाहण्यात आली.मंत्रालयीन समन्वयक रफिक मुलानी यांना महाराष्ट्र संघटन व संपर्क प्रमुख म्हणून तर विकास भोसले यांची चेंबूर तालूका संघटन प्रमुख पदांची नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.प्रभावी कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनाप्रोत्साहनपर स्मृतीचिन्हांनी सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र संघटन प्रमुख रफिक मुलानी, खंडूजी खोसे पाटील,सुशांत संखे,मो.सादिक शेख,विनोद चाळके,कमलेश कुबल,उमेश चौधरी,विकास भोसले,सुहास मोरे, राजा आंगणे व ईतर पत्रकारांची उपस्थिती होती. संचालन व आभारप्रदर्शन पत्रकार महिला आघाडी प्रमुख सौ.सुषमा ठाकूर यांनी केले.