या योजनेअंतर्गत सध्या ग्रामीण भागातील ५वी ते १२वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना शाळेत जाण्यासाठी एसटीने मोफत प्रवास सवलत लागू आहे. ही सवलत आता १२वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनींकरीता राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. ही सवलत १०० टक्के इतकी आहे.
या योजनेचा फायदा घेत हितकारिणी उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्यध्यापक जय फुलझेले यांनी वरील योजनेची सर्व माहिती घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील बरडकिन्ही,गांगलवाडी,तळोधी खु. येथील विद्यार्थिनींना सकाळी 7 वाजता विद्यालयात येण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी उच्च माध्यमिकचे प्राध्यापक मेश्राम सर, लाकडे सर,प्रधान सर,दोनाडकर सर,सहारे सर यांच्या साहाय्याने यादी तयार करून 30 विद्यार्थिनींना पासचे वितरण केले.