कारंजा तालुका वकील संघाच्या 25 जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकी मध्ये एकमताने वकील संघाच्या कार्यकारिणीची निवड होऊन त्यामध्ये अध्यक्ष पदी ऍड. निलेश कानकीरड (पाटील )यांची तर उपाध्यक्षपदी ऍड.ज्योती बाजड यांची अविरोध निवड करण्यात आली.तसेच सचिव पदी ऍड. स्वप्नील वि.नायसे (सावजी ), कोषाध्यक्षपदी ऍड. राहुल जे बांडे तर कार्यकारिणी सदस्यपदी ऍड प्रीती नांदे यांची निवड करण्यात आली.
तालुका वकील संघाच्या नूतन कार्यकारिणी निवडणुकीच्या सम्पन्न झालेल्या बैठकीत ऍड. रवींद्र रामटेके यांनी केलेल्या सूचनेला माजी अध्यक्ष ऍड.सुभान खेतीवाले यांनी अनुमोदन दिले व सर्वानुमते कारंजा तालुका वकील संघाच्या नवीन कार्यकारिणीची अविरोध निवड करीत तालुका विधिज्ञ् मंडळाने आपला पायंडा कायम ठेवला यावेळी ऍड. अरुण खंडागळे ऍड विजय छल्लानी ऍड. डी जी. वाडेकर,ऍड. डी के. पिंजरकर ऍड आतिष चौधरी ऍड. निलेश बोरकर ऍड. खेतीवाले यांनी पुढील काळात निवड समितीने योग्य वाटचाल करून नवीन वर्षाच्या सदीच्छा दिल्या.यावेळी माजी अध्यक्ष यांनी आपला कार्यभार नूतन कार्यकारणींकडे सोपवीला तसेच उपस्थित सर्व वकील मंडळीकडून निवड मंडळाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आभार ऍड अनिल पवार यांनी मानले.