वाशिम : केन्द्रशासन आणि राज्यशासनाने देशातील संपूर्ण जनते करीता आधारकार्ड अनिवार्य केले असून, डिजीटल इंडियाच्या आधुनिक काळात, जनता जनार्दनांना देण्यात येणाऱ्या सर्वच शासकीय योजनांकरीता,विविध संकेतस्थळावरून ऑनलाईन व्यवहार सुरु केले आहेत. त्यामुळे अगदी बँकेच्या बचत खात्या पासून तर स्वयंपाकाच्या गॅस वापरा करीता मोबाईल द्वारे ओपिडी घेऊन नोंदणी अत्यावश्यक केली आहे. कॉन्व्हेन्ट,प्रायमरी,माध्यमिक, उच्च महाविद्यालयीन विद्यार्थ्याकरीता अध्ययन ते शिष्यवृत्ती योजना,शेतकऱ्यांच्या आर्थिक मदत,पिकविमा, कर्जपुरवठा,हवामान अंदाज, आपात्कालिन सूचना इ करीता, बारा बलुतेदारांना विश्वकर्मा योजनेसाठी,मजूर,कामगारांना त्यांच्या योजनासाठी,महिला सक्षमीकरण व स्वावलंबन योजनेकरीता,पंतप्रधान आवास योजना,स्वनिधी,मुद्रा लोण, गोल्ड लोण,सोने,प्लॉट,शेती खरेदी व नोंदणी इत्यादी कामांकरीता, सेवानिवृत्त कर्मचारी,निराधार,दिव्यांगाना निवृत्ती वेतना करीता मोबाईल नंबर जोडलेले आधारकार्ड आणि स्वतःचा मोबाईल असणे अत्यावश्यक करण्यात आलेले असून आधारकार्डला मोबाईल नंबर जोडून संपूर्ण नाव,जन्मतारिख,रहिवासाचा पत्ता व मोबाईल नंबर असलेले अद्यावत केलेले नवीन आधारकार्ड असणे अत्यावश्यक करण्यात आलेले आहे.त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी स्वतःचा मोबाईल जोडून आपआपले आधारकार्ड (अपडेट)अद्यावत करून घेण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.