येथून जवळच असलेल्या जिल्हा परिषद शाळा अनई येथे वार्षिक स्नेहसम्मेलनच्या निमित्ताने दि.4 मार्च सायंकाळी 6 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमासाठी सर्वप्रथम माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले व नंतर फित कापून सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी कार्यक्रमचे अध्यक्ष जी. प. सदस्य सुनीता नाखले, प्रमुख अतिथि माजी सरपंच संकेत नाखले, ग्रा. स.गंगा रंन्नू भवानीवाले, ग्रा. स. सौ.फातेमा रफीक दरगेवाले,रहमान भाई नंदावाले ,लियाकत मुन्नीवाले प्रा. सी पी शेकुवाले,, गवली समाज संघटने चे सचिव सुब्हान चौधरी, कामनवाले सर अंगनवाड़ी सेविका सुनीता इंगोले,शाळेचे मुख्यध्यापक प्रमोद नाखले सर, शिक्षक युसूफ खेतीवाले सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष ,आदि हजर होते यावेळी सर्व प्रथम मान्यवराचा सत्कार करण्यात आला .
आपल्या प्रास्तविकातून मुख्यध्यापक नाखले सर यांनी शाळा संबधीत समस्या मांडल्या आणि अनईच्या इतिहासात हा कार्यक्रम पहिल्यादाच आयोजित केला असल्याचे स्पष्ट केले या वेळी ग्रामस्थ यांचे मौलाचे सहकार्य लाभले असल्याचे म्हणाले,त्यानंतर प्रा. शेकुवाले सर यांनी या स्नेह सम्मेलनचे कौतुक केले ग्रामीण भागात अशा कार्यक्रमाची अत्यंत गरज असून कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्याची शिक्षण व सांस्कृतिक क्षेत्रात प्रगति होत असल्याचे ते म्हणाले,
सदर कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी लोकगीत कोळीगीत राष्ट्रीयगीत कव्वाली एकांकिका आदीं विषयावर आपले कौशल्य सांस्कृतिक कार्यक्रमातून सादर केले यावेळी गावातील विद्यार्थी पालक माता पालक ,तरुण मंडळ व व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लियाकत मुन्नीवाले व आभार शाळेचे शिक्षक युसूफ खेतीवाले मानले.याप्रसंगी शाळा व्यवस्थापण समिति अध्यक्ष, सदस्य,व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते असे वृत्त लियाकत मुन्निवाले यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेला दिले आहे .