कारंजा : कारंजा नगर पालिकेची सत्ता एकहाथी मिळविण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रयत्नच नव्हे तर हमखास सत्ता मिळवून, कारंजा नगर पालिकेवरील राष्ट्रवादीचे बंद पडलेले घडयाळ पूर्ववत सुरु करणार असल्याचे विश्वसनिय वृत्त, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना मिळाले आहे . याबाबत अधिक वृत्त असे की, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते युसूफसेठ पुंजानी, माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, युवानेते देवव्रत डहाके यांच्या नेतृत्वात आगामी नगर पालिकेची निवडणूक लढविली जाणार असून, त्यांच्या तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांच्या संपर्कामुळे ते सहज शक्य होणार आहे . विरोधी पार्टी मात्र छोट्या छोट्या गटा तटाच्या राजकारणात विखुरल्या जात असल्याचे स्पष्ट दिसत असून, कारंजा नगर पालिका निवडणूकीत प्रत्येक पक्ष व अनेक गट आपआपले उमेद्वार उभे करण्याच्या तयारीत असून, आपसात निवडणूक लढविण्याची चिन्हे दिसत असल्याने त्याचा सुद्धा लाभ राष्ट्रवादीला मिळू शकतो . . . कारंजाचे जावई असलेले गृहमंत्री ना. दिलीपरावजी वळसे पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार यांचे सुद्धा दौरे कारंजा मतदार संघात होऊ घातलेले असल्याचे विश्वसनिय सुत्राकडून कळत असल्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला बळकटी मिळणार आहे . त्यामुळे राष्ट्रवादी करीता नगर पालिकेची वाट सहज सोपी होणार असल्याची दाट शक्यता आहे .