कारंजा : अखिल भारतिय नाट्य परिषदेच्या निवडणूक रणक्षेत्रातील,बहुजन उमेद्वार नंदकिशोर अंबादास कव्हळकर हे धार्मिक,आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रातील,प्रामाणिक, मनमिळाऊ एकनिष्ठ व सत्यवचनी असणारे विश्वासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात.खोटे बोलण्याची त्यांना प्रचंड चिड असून,ते स्वतः नाट्य कलावंत असून,नाट्यकलावंताशी केव्हाही लबाड बोलत नाहीत आणि भजनी मंडळाचे पुरुष असो किंवा महिला भगीनी असो,त्यांची फसवणूक करीत नाहीत.त्यामुळे कारंजा तालुक्यात त्यांचे हजारो चाहते आहेत.मनभा येथील परमहंस नागाबाबा संस्थानचे ते सचिव असून,कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये त्यांचा अडत व्यवसाय आहे.आपल्या व्यवसायात सुद्धा ते प्रामाणिकतेने चोख व्यवहार करीत असल्याने ग्रामिण भागात अनेक शेतकर्याचे ते लाडके अडते ठरले आहेत.असे अष्टपैलू नेतृत्वाचे धनी असलेले उमेद्वार कारंजा येथून वाशीम जिल्ह्याच्या नाट्य क्षेत्राला उमेद्वार म्हणून मिळाल्याने व त्यांच्या जोडीला वाशिम येथील उज्वल दत्तात्रय देशमुख यांच्या सारखे सक्षम व प्रभावी उमेदवार मिळाल्याने वाशिम व कारंजा येथील कलावंताच्या बहुतांश मंडळ व संस्थानी त्यांना जाहीरपणे आपला पाठींबा दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने, कला क्षेत्रातिल नामांकीत असलेल्या विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे, ईरो फिल्मस् प्रॉडक्शन कारंजाचे डॉ. इम्तियाज लुलानिया व रोमिल अरविंद लाठीया यांनी, आदर्श जय भारत सेवाभावी संस्था, संगीत परिवार इत्यादींनी आपला पाठींबा नंदकिशोर कव्हळकर व उज्वल देशमुख यांना दिलेला आहे. व येणार्या रविवारी दि १६ एप्रिल २०२३ रोजी होणाऱ्या निवडणूकीत त्यांनाच विजयी करण्याचे आवाहन केले आहे.