वाशिम जिल्हा महाराष्ट्र साप्ताहिक पत्रकार परिषद वाशिमचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले की, "रस्ते , उड्डणपुल ही सार्वजनिक मालमत्ता असते . नाही तेथे राजकारण करून आणि केवळ संकुचित विचारांचे घाणेरडे केवळ श्रेयवादाचे राजकारण करून तुम्ही नावासाठी राजकारण करण्यात तुमची वेळ,शक्ती, पैसा घालवीत असाल तर त्याला काहीच अर्थ नाही . आज आपण बघा एका रस्त्यावर शेकडो पुल असतात . मग तुम्ही प्रत्येक लहान मोठ्या पुलाला नावं देण्यात तुमची एनर्जी घालवीता का ? त्यापेक्षा त्या रस्त्यावर किती आणि कोठे कोठे खड्डे पडले आहेत तिकडे लक्ष्य पुरवा ? वाशिम शहर जिल्ह्याचे शहर आहे . शहरात रस्ते नाहीत . चहुकडे खड्डे पडलेले आहेत हीच अवस्था जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक तालुक्याची आणि त्यांना जोडणाऱ्या खेड्यापाड्याची आहे . केवळ एक उड्डाणपुल पाच - सहा वर्षनंतर तयार झाला म्हणून तुम्हाला श्रेयवादाच्या उकळ्या येण्याऐवजी प्रत्येक खेड्यापाडयाला जोडणाऱ्या रस्त्यातील नादुरुस्त पुलाकडे आणि प्रत्येक रस्त्यांवरील खड्ड्यांकडेलक्ष्य दिले . व निदान खड्डे बुजविण्याकडे व संभाव्य अपघात जरी तुम्ही टाळले तरी स्थानिय जनता तुम्हाला डोक्यावर घेईल . "