कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे ) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च मध्यमिक शिक्षण मंडळाने २ जून
रोजी माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा मार्च 2023 चा ऑनलाईन निकाल घोषित केला आहे.त्यामध्ये बाबासाहेव धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डीचा माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र परिक्षा 2023 चा निकाल 90.90 लागला आहे.
सदर परिक्षेला या विद्यालयातून 33 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 30 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.त्यापैकी 14 विद्यार्थी प्राविन्य श्रेणीत, 07 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 07 विद्यार्थी द्वितीय श्रेणित तर 02 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणित उतीर्ण झाले आहेत.
कु.समीक्षा विश्वनाथ सराफ व तनुजा संजय कोपरकार या दोन्ही विद्यर्थिनीनी 88.40% गुण प्राप्त करून विद्यालयातून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.गौरव अतुल रीठे याने 83.80% गुण घेऊन द्वितीय क्रमांक,श्रेया राजाराम इंगळे हीने 81.60 गुन मिळवून तृतीय क्रमांक, गणेश राजू तायडे याने 81.00 गुन घेवून चवथा तर कु.प्रिया नाना पारे हीने 79.60% गुन घेवून पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे.
शाळेचे संस्थाध्यक्ष केशवराव खोपे, मुख्याधापक विजय भड, शिक्षक राजेश शेंडेकर, शालिनी ओलीवकर, गोपाल काकड, अनिल हजारे, शिक्षकेत्तर कर्म देविदास काळबांडे ,भालचंद्र कवाने, राजु लबडे, राजेंद्र उमाळे, राजेश लिंगाटे यांनी अभिनंदन केले आहे. सदर्हू विद्यालयाचे व्यवस्थापन, मुख्याध्यापक विजय भड यांची सर्वकष अशी कुशल अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून चोवीस तास अविरत मिळणारे मार्गदर्शन त्यामुळे बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डी या संस्थेने कला, क्रिडा व शिक्षण या प्रत्येक क्षेत्रात कायमच आघाडी घेत नावलौकीक प्राप्त केलेला असून येथील विद्यार्थ्यी दरवर्षी उत्कृष्ट प्राविण्य मिळवून आपल्या विद्यालयाची किर्ती वाढवीत असल्याचे पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले आहे .