कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील पहिली बाजारपेठ म्हणून नावलौकिक असलेल्या,कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये,भारतिय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनाचे ध्वजारोहण सभापती श्रीमती सईताई प्रकाशराव डहाके यांच्या शुभहस्ते करण्यात आले. ध्वजारोहणानंतर ध्वजाला मानवंदना देऊन,राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. यावेळी सर्व संचालक,खेडे विभागातील गटसचिव,अधिकारी,कर्मचारी, अडते,दलाल,व्यापारी व नागरिकांची उपस्थिती लाभली होती.