ब्रह्मपुरी: तालुक्यातील रणमोचन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत पुढील दोन वर्षासाठी शाळा शिक्षण व्यवस्थापन समिती गठीत करण्यासाठी पालक सभा आयोजित करण्यात आली होती १३ सप्टेंबर ला शाळेत अविरोध निवड प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी योगेश मुखरू पिलारे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून अनु नागेश्वर अलमस्त तर सदस्य पदी नीलिमा नीलकंठ राऊत रितू राकेश मेश्राम अरुण सदाशिव मेश्राम मंजुषा मंगेश सोनुले सुभाष महादेव प्रधान रेशम नीलकंठ शंभरकर गीता हिरालाल मैन्द आधींची निवड करण्यात आली सदर निवड प्रक्रिया ग्रामपंचायत सरपंच नीलिमा राऊत ग्रामपंचायतचे उपसरपंच सदाशिव आत्माराम ठाकरे रणमोचन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक झुरमुरे यांनी पार पाडली यावेळी नवनियुक्त शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे ग्रामपंचायतीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विनोद दोनाडकर किशोर पिलारे सुधीर राऊत किरमिरे गुरुजी राऊत गुरुजी रामटेके गुरुजी राजीव प्रधान नामदेव गुरुनुले अनुज _खोब्रागडे_ गावातील पालक व महिला मंडळी उपस्थित होते
आपल्या प्रतिक्रिया द्या....
=================================
Post Views: 258