चंद्रपूर : जिल्ह्यातील सावली तालुक्यातून अवैद्य गोवंश तस्करी करणा-या रॅकेटचा सावली पोलिसांनी पर्दाफास केला आहे. ट्रक मध्ये जनावरे कोंबून नेणा-या आरोपींसह 19 जनावरांना जिवदान दिली आहे. या प्रकरणात 11 लाख 90 हजाराचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
सोमवारी (12 एप्रिल 2022) ला रात्रीसुमारास सावली पो.स्टे हद्दीतून अवैध गोवंशाची वाहतुक होणार असल्याची गुप्त माहिती सावली पोलिसांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे व्याहाड़ नजीक चिचबोडी फाटा मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी केली. पहाटेला साडेतीनच्या सुमारास गडचिरोलीकडून एकामागोमाग येणारे अशोक लेलँड वाहन क्र.टि एस 07 यू एफ 3182 ट्रकला थांबविले. सदर वाहन्ची तपासणी केली असता लहानमोठे 19 गोवंश जनावरे अत्यंत निर्दयतेने कुरपणे तोंडाला मोरके व दोराने पाय बांधून कोंबुन आढळून आले.
सदर 19 गोवंश जनावरे 1 लाख 90 हजार रूपये, वाहन किंमत 10 लाख रूपये असा11 लाख 90 हजार रूपयेचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. सदर गोवंशांना सुरक्षीतता व आरोग्याच्या दृष्टीने गोशाळेत दाखल करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये इब्राहीम खान हमीद खान (वय 30) रा अन्सारी रोड राजेंद्रनगर, रंगारेड्डी , आंध्रप्रदेश तसेच वाहनाचे मालकाविरोधात महाराष्ट्र पशू संवर्धन कायदा कलम 5 ( अ ), ( ब ) प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11 डी.एफ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 119, मोटरवाहन अधिनियम कलम 83 / 977 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे, ठाणेदार आशिष बोरकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा फौजदार लक्ष्मण मडावी, पितांबर खरकाटे, पोलीस कॉन्स्टेबल दिपक चव्हाण, धिरज पिटुरकर, चालक कुहमेशे यांनी केली आहे.