जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आज संपुर्ण जगामध्ये नावारूपास आलेली आहे. गेल्या ७५ वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या हितासाठी व भारतमातेच्या सेवेसाठी तत्पर व निरंतर कार्य करित आहे. विद्यार्थी हा आजचा नागरिक असुन तो ह्या देशाचे भविष्य आहे ह्या तत्त्वावर चालणारी ही एकमेव संघटना नियमित कुठल्या न कुठल्या उपक्रम वा कार्यक्रमाच्या स्वरूपात समाजामध्ये समोर येतच असते.
नुकतेच १० व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा संपल्या असुन विद्यार्थ्यांमध्ये पुढील अभ्यासक्रम काय निवडायचं ह्या मध्ये अनेक तिढा निर्माण होतात. त्याच बरोबर आपल्या व्यक्तीमत्वामध्ये भविष्याच्या अनुषंगाने बदल हवा ह्या अनुषंगाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या कारंजा लाड शाखेतर्फे धैर्य व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन ५ मे रोजी करण्यात आले. स्थानिक नूतन सांस्कृतिक सभागृह, नूतन कॉलनी येथे दिवसभराच्या ह्या शिबिरात वेगवेगळ्या सत्रामध्ये विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्यात आले. ह्या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रसिद्ध आर्थोतज्ञ डॉ.पंकज कटोले तर प्रमुख अतिथी म्हणून अद्वीका फार्मसी कॉलेज व रिसर्च सेंटर चे प्राचार्य प्रा. राम घोटकर उपस्थित होते. ह्या वेळी अभाविप वाशिम जिल्हा संयोजक श्री. सुमित बरांडे व जिल्हा सह संयोजिका सुश्री. विजया मोरे ह्या विशेष रूपाने उपस्थित होत्या.
शिबिराच्या पहिल्या सत्रामध्ये सुंदरम् कोचिंग क्लासेस चे संचालक श्री. रोहन जाधव सर ह्यानी १० वी व १२ वी नंतर काय ह्या विषयावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात श्री. प्रणव बोबडे ह्यांनी उद्योजकता ह्या विषयावर विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. शेवटचे सत्र मनोरंजन सत्रामध्ये हास्यकवी श्री. धनस्कर सर ह्यांनी विनोदी कविता द्वारे विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राप्ती कदम तर कार्यक्रमाच्या यशाकरिता रुद्र लोटे, निरज सुरतकर, चारूल गुंठेवार, श्रेया चौधरी, सौरभ जयराज, ओम शेलवंटे, रोहित बरसोडे, हर्ष टेवरे आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.