आरमोरी:- शहरातील युवारंग तर्फे आयोजित निशुल्क समर कॅम्प मध्ये आज दिनांक ५ मे २०२२ ला शरीर विज्ञान व आयुर्वेदिक वनस्पती याबद्दल माहिती देण्यात आली.
याप्रसंगी आरमोरी शहरातील प्रसिद्ध डॉ.प्रदीपजी खोब्रागडे सर यांनी मानवी शरीरामध्ये कार्य करणारे विविध अवयव व त्यांची कार्य करण्याची पद्धत याबद्दल विस्तृत माहिती दिली.
तर वनस्पती विशेषतज्ञ मा. चारुदत्त राऊत सर यांनी आपन जीवनात आजारी पडू नये किंवा आधारित पडल्यास उपयोगात येणाऱ्या विविध आयुर्वेदिक वनस्पती बद्दल विस्तृत अशी माहिती दिली याप्रसंगी युवारंग चे उपाध्यक्ष मा.मनोजजी गेडाम , संघटक मा.सुरज पडोळे , सदस्य रोहित बावनकर , प्रशांत सोरते, पंकज इंदुरकर ,मयुर कांबळे, निखिल शेरकुरे, लुकेश शेरकुरे उपस्थित होते