कारंजा : "लोकसभा निवडणुकीच्या वेळी बांधलेली वज्रमूठ विधानसभा निवडणुकीच्या वेळीही अशीच कायम ठेवून,महाराष्ट्राच्या विधानसभेवर डौलाने भगवा फडकवा.महायुतीच्या भ्रष्टाचाराने त्रस्त झालेल्या रयतेला पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनाच पहायचे आहे " असे भावनिक उद्गार,यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांनी आपल्या सत्काराला प्रत्युत्तर देतांना काढले.
इंझोरी सर्कलच्या वतीने स्थानिक शिवसेना (उबाठा) गटाने आयोजित केलेल्या जाहीर सत्कार समारंभात ते बोलत होते.
जामदरा,तोरणाळा,मसनी, चौसाळा,उंबरडा,अजनी,दापुरा, भोयणी,मोहगव्हाण,रुद्राळा, खंडाळा,धानोरा,पारधी तांडा, वाकी इत्यादी ठिकाणाहून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी संजय देशमुख यांचा सत्कार केला आणि आपल्या भागातील समस्या मांडून निवेदने दिली.या प्रसंगी रवी पवार डॉ.श्याम जाधव ,डॉ. सुभाष राठोड, सौ.ज्योती गणेशपुरे यांनी मनोगत व्यक्त केले.अमरावती येथील युवासेना जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर म्हणाले की,महाविकास आघाडीचा उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला तरी सर्व जनता एकदिलाने त्याच्या पाठीशी उभे राहून त्याला भरघोस मतांनी निवडून देते व यापुढेही देणार आहे हे नुकत्याच लोकसभा निवडणूकीतील मविआच्या विजयाने सिद्ध झाले आहे.कार्यक्रमात असंख्य युवकांनी घेतलेला पक्षप्रवेश लक्षवेधी ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास पाटील चौधरी,हिम्मत पाटील राऊत व जगदीश आरेकर यांनी केले.डॉ.विठ्ठल घाटगे,मधुसुदन राठोड,बाळू राठोड,देवानंद हळदे, रमेश येलदरे,संतोष येलदरे, गोपाल यादव,राम शिंदे,आकाश हळदे,हरीश दिघडे,संतोष शिंदे, आनंद बारडे, अंकुश ठोंबरे, डॉ.मनवर,डॉ. कलीम मिर्झा,डॉ. शेंदूरकार,मंगेश पाटील,अमोल धोंडे,अरुण पाटील,मंगेश पवार,मंगेश काळेकर,चिंतामण वाघमारे, हिरामण ढोक, राधेश्याम ढोरे,प्रकाश लोखंडे, खुशाल इंगोले,यादवराव जाधव, नरहरी आरेकर,तुषार राखोंडे, रमेश इंगळे,प्रकाश हळदे,नंदकिशोर हरमकार,आनंद अलाटे,तुकडू शहा,शकील शहा, संतोष वानखेडे,विकी बनकर, विकी काळेकर,धनंजय काळेकर, प्रकाश हळदे, हरीश शामसुंदर, चेतन भोने,किरण राठोड पाटील, चेतन डोईफोडे,संतोष ढोके, दत्ता काळेकर, निशिकांत डोईफोडे , नितीन चव्हाण,रामचंद्र भोजापुरे, दिगंबर पायघन,दिलीप तायडे,लखन जाधव,कैलास डोंगरे, गुलाब चव्हाण महिला आघाडीच्या कमला दिघडे, सुचिता भोजापुरे, गोपाली दिघडे,दुर्गाबाई खडसे,संगिता खडसे,तसेच सपना वाघमारे, कल्पना डोंगरे .... या प्रमुख कार्यकर्त्यांसह असंख्य लोक हजर होते.असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांचेकडे डॉ कलिम मिर्झा यांनी कळविले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....