धान रोवणीच्या कामात व्यस्त असलेल्या तरुणावर अस्वलाने अचानक हल्ला चढविला. यावेळी त्याने एकट्यानेच अस्वलाशी झुंज दिली आणि प्रतिकार करतानाच आरडाओरड केल्याने इतर शेतकरी धावले व त्यांनी अस्वलाच्या तावडीतून त्यास सोडवले. ही घटना धानोरा तालुक्यातील मुरुमगाव येथे गुरुवार ३ ऑगस्ट रोजी घडली. अशोक फरदीया (३७, रा. मुरूमगाव) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून प्रकृती स्थिर आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश गजभे यांच्या देखरेखीत उपचार सुरु आहेत.