अकोला: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक उपक्रम संपूर्ण भारतभर राबवले जात आहेत .संस्थेने मातृदिन निमित्य दि.१२ मे २०२४ रोजी विशेष आरोग्य कार्यशाळेचे आयोजन केले . दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या कार्यालयात आयोजित कार्यशाळेच्या मार्गदर्शक स्त्री रोग तज्ञ डॉ.दिपाली काळे व डॉ.श्रीकांत काळे यांनी मार्गदर्शन केले. प्रस्तुत कार्यशाळेत महिलांचे आरोग्य विषयक प्रश्न , आहार , विहार , आधुनिक जीवनशैलीमुळे होणारे रोग व त्यावरील उपाय योजना या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले . उपस्थित दिव्यांग सदस्यांनी आपले विविध प्रश्न ऑनलाईन व प्रत्यक्षपणे या कार्यशाळेत मांडलेडॉ.दिपाली काळे व डॉ.श्रीकांत काळे यांनी प्रश्नांना उत्तरे देऊन शिबिरार्थ्यांचे शंका निरसन केले . सदर कार्यशाळेचे प्रसारण दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या फेसबुक , इंस्टाग्राम व यूट्यूब चैनल वरून लाईव्ह करण्यात आले*.त्यामुळे याचा फायदा भारतातील विविध दिव्यांग बांधवांनी घेतला . डॉ.विशाल कोरडे यांनी संस्थेतर्फे मार्गदर्शक डॉ.दिपाली काळे व डॉ.श्रीकांत काळे यांचा सत्कार केला . मातृदिन विशेष आरोग्य कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी अस्मिता मिश्रा, अनामिका देशपांडे, विजय कोरडे, पूजा गुंटीवार, विणा राठोड, अरविंद देव, प्रतिभा काटे, अंकुश काळमेघ, विशाल भोजने, संजय तिडके व श्रीकांत कोरडे यांनी सहकार्य केले .