महात्मा कबीर समता परिषद, नांदेड तर्फे देण्यात येणारा, महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा महाराष्ट्रभूषण व जीवनगौरव पुरस्कारासाठी श्री पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर (श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ ) यांची निवड झाली आहे. पुरुषोत्तम बैस्कार हे साहित्यिक व समाज प्रबोधन कार्य करतात म्हणून संस्थेने सन २०२३-२४ ह्या वर्षीचा महाराष्ट्रभूषण व जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. त्यांचे कार्य समाज उपयोगी आहे.