कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे): जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस (भाप्रसे) यांनी कारंजा नगर परिषद मुख्याधिकारी व कर्मचारी यांनी राबविलेल्या अतिक्रमण मोहिमेचे कौतुक करीत सर्व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले.
नगर परिषद कार्यालयात दि. 14 ऑक्टोंबर 2023 रोजी वाशिम जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस (भाप्रसे) यांनी नगर परिषद कारंजा कार्यालयास भेट देऊन विविध योजनांचा आढावा घेतला.
सदर आढावा बैठकीस मुख्याधिकारी दीपक मोरे यांच्यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांचे मुख्याधिकारी दीपक मोरे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागाची योजना निहाय आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी नगरपरिषद कारंजा यांनी राबविलेल्या अतिक्रमण मोहिमेचे जिल्हाधिकारी एस.बुवनेश्वरी यांनी कौतुक केले शहरात राबविलेल्या अतिक्रमण मोहिमेमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल नगरपरिषद कर्मचारी अहमद खान व कैलास बारबोले यांचा जिल्हाधिकारी एस भुवनेश्वरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांनी सर्व कर्मचाऱ्यांनी विविध योजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या यावेळी कारंजा उपविभागीय अधिकारी ललित कुमार वऱ्हाडे याची उपस्थिती होती.नगर परिषदेत येणारी सामान्य माणसाची सर्व कामाचा तीन दिवसात निपटारा करून त्याचे समाधान करण्याच्या सूचना केल्यात व जी काम लवकर करणे शक्य नाही त्यासाठीचा वेळ सांगून सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम करा असे आदेश दिलेत.यावेळी नगर परिषदेचे सर्व विभाग प्रमुख,व कर्मचारी यांची उपस्थिती होती.