गडचिरोली:-
कुणबी समाज सेवा समिती, जिल्हा गडचिरोली च्या वतीने ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी 5 ऑक्टोबर 2023 रोजी कुणबी महामोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या महामोर्चाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाने संपूर्ण पाठिंबा जाहीर केला असून, गडचिरोली व नजीकच्या जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गातील सर्व जात संघटनांनी या मोर्चात तन-मन - धनाने सहभागी होऊन मोर्चा सफल करावा अशी विनंती राष्ट्रीय ओबीसी महासंघ जिल्हा गडचिरोलीच्या वतीने करण्यात येत आहे.
या महामोर्चाच्या माध्यमातून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचे ओबीसीकरण करू नये, महाराष्ट्रातील सर्व जातींची जात निहाय जनगणना करण्यात यावी, गडचिरोली जिल्हा सह इतर बारा जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील ओबीसींचे 17 संवर्ग पदाचे आरक्षण शून्य झाले आहे, हा ओबीसी समाजावर मोठा अन्याय असून तो तात्काळ दूर करण्यात यावा., गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे वर्ग 3 व 4 च्या नोकर भरतीतील आरक्षण पूर्ववत 19 टक्के करण्यात यावे. सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण व शासकीय शाळांचे खाजगीकरण त्वरित थांबवावे, ओबीसींच्या विद्यार्थ्यांसाठी तात्काळ वस्तीगृह सुरू करण्यात यावे तसेच त्यांच्यासाठी स्वाधार योजना लागू करण्यात यावी इत्यादी मागणी सह इतर 11 मागण्यांच्या समर्थनार्थ कुणबी महामोर्चा चे आयोजन करण्यात आलेले आहे. या महामोर्चात ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ओबीसींचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी सरकारला भाग पाडण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती संघटनेच्या वतीने प्रा. शेषराव येलेकर राष्ट्रीय उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ, दादाजी चुधरी जिल्हाध्यक्ष, विनायक बांदूरकर कार्याध्यक्ष,
प्रा. देवानंद कामडी सचिव,
पांडुरंग घोटेकर उपाध्यक्ष,
डॉ सुरेश लडके कोषाध्यक्ष,
सुरेश भांडेकर व चंद्रकांत शिवणकर जिल्हा संघटक,
राहुल भांडेकर युवा उपाध्यक्ष,
श्रीमती भावना वानखेडे,मंगला कारेकर.किरण चौधरी विभागीय कार्यकारणी पदाधिकारी,
संगीता नवघडे महिला अध्यक्षा
श्रीमती सोनाली पुण्यपवार शहर अध्यक्ष,
श्रीमती सुधा चौधरी, ज्योती भोयर जिल्हा संघटक यांनी केली आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....