विद्यार्थ्याला ज्ञानदान करण्यासोबत समाजशास्त्राचे धडे देवून त्यांना शालेय राष्ट्रीय उपक्रमासोबतच सामाजिक कार्याकरीता प्रेरीत करणाऱ्या, आदर्श असे शिक्षक प्रदिप वनारसे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्यांच्या मित्रमंडळांनी मोठ्या उत्साने त्यांचा भव्य सन्मानसोहळा घडवून आणला. या कार्यक्रमाचे आयोजन ,आदर्श जय भारत सेवाभावी संस्था व जिल्हा परिषद शिक्षक संघटना बायपास कारंजा यांचे कडून कारंजा येथे करण्यात आले होते. हास्यमुख असलेले प्रदिप वनारसे सर हे प्रामाणिक मनमिळाऊ, विश्वासू कार्यतत्पर व हजरजवाबी म्हणून ओळखले जातात . त्यामुळे विद्यार्थ्याचे भवितव्य घडविणाऱ्या,सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या आदर्श शिक्षक प्रदिप वनारसे यांचा वेगवेगळ्या संघटनांकडून सत्कार सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आदर्श जय भारत सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर गरड, जिल्हा परिषद शिक्षक संघटनेचे बांडे सर दुगोरा , बिजवे सर ,गावंडे सर सर्व संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होती सत्कारमूर्ती प्रदीप वनारसे सर यांना डॉ ज्ञानेश्वर गरड यांच्याकडून चवऱ्या महादेव फोटो व फुलांचा गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पुरोगामी शिक्षक संघटना वाशिमचे विष्णू अंभोरे सर, वाघ सर , प्रदीप गावंडे सर, इरफान मिर्झा सर, राजेंद्र सोमनाथ सर गणेश शंकरपुरे सर, गजेंद्र निमके दर , बिहाडे सर ,साहेबराव शिंदे सर , धनकर सर, नगरे सर व इतर शिक्षक मंडळी उपस्थित होती असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना मिळाल्याचे त्यांनी कळविले .