कारंजा लाड दि. 1 /3/24 रोजी सायंकाळी 6:20 मी सुमारास घरगुती गॅस सिलेंडर लिकेज असल्यामुळे घराला आग लागल्याची घटना उघडकीस आली. सविस्तर असे की, तुळजाभवानी कॉलनी येथील किशोर वानखडे याच्या घरी गॅस सिलेंडर लेकेज मुळे भीषण आग लागली. घटनेची माहिती श्री संत गाडगेबाबा विचार मंच अध्यक्ष संतोष धोगळे यांनी नगरपरिषदचे मुख्याधिकारी मोरे यांना मिळाली त्यांनी अग्निशमन अधिकारी अनुज कुमार बाथम यांना दिली त्यानी तात्काळ फायर टीम सह घटनास्थळ गाठले व तेथील आगीवर नियंत्रण मिळवले. घरातील किचन मधील साहित्य आगीत जळून खाक झाले. अग्निशामक चालक बाळूभाऊ काठोळे , फायरमन सचिन बैस, नरेंद्र भोयर , शुभम झोपाटे,इम्रान खान ,राहुल गुल्हाने , अनुराग बारबोले व त्यावेळी लोकेशन कारंजा 108 पायलट नरेंद्र बारसे,डॉ. गणेश सर हे त्यावेळी घटनास्थळी उपस्थित होते