कारंजा [लाड]-- कारंजा शहरात गेल्या अनेक वर्षापासून, स्वखर्चाने निःस्वार्थ समाजसेवा करीत असलेली दोन मित्रांची सुप्रसिद्ध जोडी म्हणजेच सेवाव्रती अब्दुल राजिक शेख आणि एड संदेश जिंतुरकर हे प्रत्येक राष्ट्रिय आणि धार्मिक सण उत्सवात हिरीरीने सहभागी होऊन निव्वळ समाजसेवा करीत असतात . मग दिव्यांगाना हवे ते सहकार्य, आजारग्रस्ताना मदत, विद्यार्थ्यांना वह्यापुस्तके वाटपासह गुणवंताचा गुणगौरव इत्यादी करीत असतात . गणपती विसर्जन व दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत पोलिस बांधवांना अल्पोपहाराचे वाटप केल्यानंतर आता मुस्लिम बांधवांच्या पवित्र अश्या जश्ने ईद मिलादुन्नबी निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते अब्दुल राजिक शेख व अॅड संदेश जैन जिंतुरकर ह्यांच्या कडून मिरवणूकीत सहभागी झालेल्या लाखो मुस्लिम बांधवांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले.
ह्या निमित्ताने सर्व धर्म समभावाचा आणि निरामयी समाजसेवेचा संदेशच जणू अब्दुल राजिक शेख व अॅड संदेश जैन जिंतुरकर ह्यांनी दिला आहे. त्याच्या ह्या कार्या बद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे .