अकोला:- रिऑन वेल्थ ट्रेडिंग अकॅडमी स्टॉक मार्केट क्लास तर्फे सेशन 2.0कार्यक्रम खूप हर्षउल्हासाथ पार पडला. यामध्ये प्रमुख पाहुणे प्रो. पुरुषोत्तम वराडे सर ओवी स्मार्ट ट्रेडचे श्रीकांत सुरेश गावंडे सर, अमित पांडे सर फिटनेस ट्रेनर राखी चव्हाण, स्वप्नाली बंड, ट्रेडर विवेक पत्रिकर, वासु चितलांगे सर जिद्द अकॅडमीचे तुषार पाटील सर यांची उपस्थिती लाभली. रियान वेल्थ ट्रेडिंग अकॅडमी अकोला यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेऊन परिवाराला कसा हातभार लावता येतो याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर इंस्टाग्राम क्रियेटर कैवल्य बागात, कौशल आगरकर प्रथमेश भुसे, साक्षी गवई, सुशील लोणकर, गुंजन हिंगे, आरजे ऋषिकेश देशमुख, अजय जागीरदार सोशल मीडिया यांचा बेस्ट क्रियेटर म्हणून रिऑन वेल्थ वेडिंग अकॅडमी अकोला तर्फे श्रीरामाच्या प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. मार्गदर्शक रियान वेल्थ ट्रेडिंग अकॅडमी जठार पेठ अकोला यांचे सीईओ आणि फाउंडर प्रशांत सुरेश गावंडे सर यांनी विद्यार्थ्यांना आर्थिक सक्षमीकरण आणि गुंतवणूक याबद्दल मार्गदर्शन केले
. सूत्रसंचालन मॅनेजर अखिलेश किशोर अनासने, यशवंत चंदन, पूजा अंबुसकर, रिद्धी गावंडे यांनी केले. सहकारी कृष्णा भडांगे, भाविक खंडाळकर, रोशन भिवटे, अमोल बानाईत, संजय वायदाने, वैष्णवी ठाकरे, विराज मैसूरकर, सुमित तिवारी, आभार रिद्धी गावंडे यांनी तर श्रेयस देशमुख यांनी कठोर परिश्रम घेऊन हॉटेल सेंटर प्लाझा मध्ये हा कार्यक्रम पार पाडला.