कारंजा : येत्या दि . 17 जानेवारी ते 20 जानेवारी 2024 च्या दरम्यान फरीदाबाद, हरियाणा येथे नवव्या आंतरराष्ट्रीय विज्ञान उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याकरिता बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डी येथील विद्यार्थी सोहम पांडुरंग कदम व विज्ञान शिक्षक विजय देविदास भड यांची निवड करण्यात आली आहे.
इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल करिता भारतातून 300 शिक्षकांची निवड करण्यात आलेली आहे. सदर सायन्स फेस्टिवल मध्ये देश विदेशातील नामवंत शास्त्रज्ञ, नामवंत तज्ञ यांचे मार्गदर्शन आयोजित केलेले आहे. आय आय एस एफ 2023 अंतर्गत स्टुडंट्स सायन्स व्हिलेज कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची गोडी लागावी, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, म्हणून एका जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिकणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. वाशिम जिल्हयातून ग्रामीण भागात शिकणाऱ्या पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
त्यामध्ये बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डी येथील सोहम पांडुरंग कदम, लक्ष्मीचंद हायस्कूल सेलू बाजार येथील पवन लोखंडे, श्री शिवाजी हायस्कूल गोभणी येथील श्रेयस खराटे, जिजामाता विद्यालय अनसिंग येथील समर्थ धायगुडे या पाच विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच नॅशनल टीचर वर्कशॉप करीता व विद्यार्थी समन्वयक म्हणून बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डी येथील विज्ञान शिक्षक विजय देविदास भड यांची निवड करण्यात आलेली आहे. हरियाणा मधील फरीदाबाद येथे उपस्थित राहण्यासाठी उद्या पाच विद्यार्थ्यां समवेत विजय भड निघणार आहेत.
वरील सर्व विद्यार्थी व शिक्षकांची फरीदाबाद येथे राहण्याची जेवणाची व प्रवासाची व्यवस्था आयोजकाद्वारे करण्यात आलेली आहे. बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डी येथील विद्यार्थी व शिक्षकांना ही संधी मिळाल्याबद्दल त्यांचे संस्थाध्यक्ष योगेश खोपे, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे, योजना शिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, उपशिक्षणाधिकारी आकाश आहाळे, गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने विस्तार अधिकारी सुनील उपाध्ये केंद्रप्रमुख नामदेव मडावी, विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच यावर्डीकर यांनी अभिनंदन केले आहे.