दि.३० आक्टोबर रोजी लाॅयन्स क्लब गडचिरोली व अंधश्रध्दा निर्मूलन समिती (अंनिस) यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली पासून ४० कि.मी. अंतरावर असलेल्या वानरचूवा या दुर्गम अशा आदिवासी गावात दिवाळीनिमित्त कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.
वानरचूवा इथे पोहोचल्यानंतर आदिवासी बांधवांशी संवाद साधतांना अंधश्रध्दा निर्मूलन समिती (अंनिस) तर्फे बुवाबाजी, चमत्कार कसे खोटे असतात हे वैद्याणिक प्रयोगाव्दारे पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.तसेच आदिवासिंच्या मुलांनी शिकून मोठे व्हावे व आपल्या गरिब पालकांचे आधारस्तंभ व्हावे या करीता त्यांना शैक्षणिक,आर्थिक अशी सर्वोपरी मदत करण्याची इच्छा सर्व सदस्यांनी आपल्या मनोगतातून बोलून दाखविली.
आज आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करतांना त्यांचेशी हितगुज करण्याची संधी मिळाली, त्यासोबतच आदिवासी मुलांमध्ये विज्ञानाची जाण निर्माण करण्याची एक संधी सुद्धा चालून आली.
वानरचूवा गावातील जवळपास ६५ कुटूंबांना लाॅयन्स क्लब व अंनिस चे सर्व सदस्य व इतर दाते यांच्या कडून जमा झालेल्या रकमेतून दिवाळीचा फराळ,टाॅवेल,ब्लाऊज पिस,साडी,ब्लँकेट व काही कपडे देण्यात आले. आज खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केल्याची जाणीव झाली.ह्यावेळी लायन्स क्लब च्या अध्यक्षा मंजुषा मोरे ,सचिव नितीन चंबुलवार, झोन चेअरपर्सन दीपक मोरे, कॅबिनेट ऑफिसर सुरेश लडके,देवानंद कामडी,नितीन बट्टुवार,संध्या येलेकर,स्मिता लडके,सुचिता कामडी तसेच अनिस चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.