वाशिम : सहकार मंत्री दिलीप वळसे - पाटील 4 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.4 ऑक्टोबर रोजी सकाळी 8:50 वाजता मुंबई येथून विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ,नागपूर येथे आगमन. सकाळी 9 वाजता मोटारीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग मार्गे कारंजा(लाड) जि.वाशिमकडे प्रयाण.सकाळी 11 वाजता पुंजानी कॉम्प्लेक्स, मेन रोड कारंजा लाड येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वाजता मोटारीने पुंजानी कॉम्प्लेक्स, मेन रोड कारंजा (लाड) येथून वाशिमकडे प्रयाण.दुपारी 1 वाजता स्वागत लॉन,शुक्रवार पेठ वाशिम येथे आगमन. दुपारी 1.15 वाजता वाशिम येथील स्वागत लॉन येथे येथे आयोजित वाशिम जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक व कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थिती. दुपारी 3 वाजता मोटारीने स्वागत लॉन येथून अकोलाकडे प्रयाण करतील.