अकोला: २६ एप्रिल २०२४ रोजी अकोला मतदारसंघात मतदान होणार आहे . मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष डॉ. विशाल कोरडे यांची मतदार साक्षरता अभियानाचे ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती केली.
डॉ. कोरडे यांनी या राष्ट्रीय उपक्रमात स्वतःला झोकून देऊन गेल्या महिन्याभरापासून दररोज १० ते १५ कार्यक्रम करून संपूर्ण अकोला जिल्ह्यात मतदार साक्षरता अभियान राबवले.दिव्यांग , नवमतदार , ज्येष्ठ नागरिक व महिला मतदारांपर्यंत डॉ.कोरडे प्रत्येक गावात महाविद्यालयात एवढेच नव्हे तर उद्योजक, व्यापारी, कामगार व ऑटो चालक यांच्यापर्यंत दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला मार्फत पोहोचले. मतदारांनी आपले विविध प्रश्न ब्रँड अँबेसिडर डॉ.कोरडे यांच्यासमोर मांडले . मतदान प्रक्रिये बाबत असंतोष त्यांना आढळला या सर्व बाबींचा विचार करून डॉ.कोरडे यांनी विविध प्रबोधनात्मक व जनजागृती पर कार्यक्रम करून मतदारांना लोकशाही टिकवण्यासाठी मतदान करणे गरजेचे आहे हे पटवून सांगितले . मतदार जनजागृतीसाठी डॉ.कोरडे यांनी चला उठा जागृत होऊन करूया मतदान या मतदार साक्षरता गीताची निर्मिती केली दिव्यांग बांधवांकडून या उपक्रमात सहभाग नोंदवला*. रेडिओ टेलिव्हिजन विविध समाज माध्यमे एवढेच नव्हे तर प्रत्येक दिव्यांग मतदारापर्यंत त्याच्या घरी जाऊन मतदान शंभर टक्के व्हावे यासाठी आव्हान केले . डॉ.विशाल कोरडे यांच्या या राष्ट्रीय कार्याची दखल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीने बातमीपत्रात नोंदवली.विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांनी डॉ.कोरडे यांचा सत्कार केला.अकोल्याचे पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंग यांनीही डॉ.कोरडे यांचा जाहीर मंचावर त्यांच्या सामाजिक व राष्ट्रीय कार्याबद्दल सत्कार व कौतुक केले. 26 एप्रिल २०२४ रोजी डॉ.कोरडे दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचून या कार्याला पूर्णत्वास नेणार आहेत . त्यासाठी संस्थेचा ९४२३६५००९० हा हेल्पलाईन क्रमांक जनसामान्यांसाठी त्यांनी उपलब्ध केला आहे* . *अकोल्यातील मतदान केंद्रावरील मतदार , विविध अधिकारी व स्वयंसेवकांना कोणतीही आरोग्य विषयक अडचण मतदानाच्या दिवशी आल्यास संस्थेतर्फे वैद्यकीय सोय सुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे.
अकोला मतदारसंघात सर्व मतदारांनी शंभर टक्के मतदान करावे दिव्यांग मतदारांनी मतदान केंद्रावर मतदान करून केंद्रावर उपलब्ध असणारा दिव्यांग मतदाराचा अर्ज भरून द्यावा असे आव्हान मतदार साक्षरता अभियान जिल्हा अकोला चे ब्रँड अँबेसिडर डॉ.विशाल कोरडे यांनी केले आहे . *मतदार साक्षरता अभियानाच्या राष्ट्रीय उपक्रमात दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या अनामिका देशपांडे, अस्मिता मिश्रा, सिद्धार्थ ओवे, गणेश सोळंके, विजय कोरडे, रोहित सुर्यवंशी, विजयकुमार वणवे व अमित सोळंके या सदस्यांनी आपला सहभाग नोंदवला