कारंजा : स्थानिक गोंधळीनगर येथील श्री कामाक्षा माता संस्थानच्या दिपमाळीजवळच्या अतिप्राचिन सगोन्या महादेव (श्री सगोनेश्वर)मंदिरचा जिर्णोध्दार नुकताच स्थानिक युवक दिनेश कडोळे यांच्या पुढाकारातून, कमलेश कडोळे, अमोल कडोळे, सागर कडोळे, रोहीत महाजन,कैलाश हांडे , प्रकाश हांडे, अमित पिंजरकर, लक्ष्मण बागडे, गजानन मेटकर, विजय महाजन, संतोष महाजन इत्यादी शिवभक्तांच्या सहकार्याने करण्यात आला होता. त्या निमित्त अश्विन कृष्ण प्रतिपदा, सोमवार दि १० ऑक्टोबर रोजी वैराग्यमुर्ती श्री संत कैलाशनाथ महाराज इंझा (वनश्री)यांचे हस्ते, यजमान दिनेश कडोळे सौ सपना कडोळे व पुरोहित श्री कामाक्षा देवी संस्थानचे अध्यक्ष दिगंबरपंत महाजन गुरुजी, सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे यांच्या उपस्थितीत आज जागृत श्री सगोन्या महादेव मंदिरावर कलश स्थापना व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे, पत्रकार दामोधर जोंधळेकर, पत्रकार विनोद गणवीर, पदमाकर पाटील कडू महाराज,रोहीत महाजन, केशवराव राऊत पाटील इत्यादीसह शिवभक्तांची बहुसंख्येने उपस्थिती होती . असे वृत्त दामोधर जोंधळेकर यांनी प्रसार माध्यमाला दिले आहे.