तालुक्यातील हळदा येथील ज्ञानगंगा विद्यालयात वर्ग ८ वी मध्ये प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांचा स्वागत,सत्कार ,पाठ्यपुस्तके वितरण व दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम पार पाडण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहु महाराज व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जे.के.ठाकरे हे हाेते तर प्रमुख अतिथी म्हणून वाय.एन.खाोब्रागडे,ए.बी.घाेडीचाेर, एस.के.दडमल,ओ.जी.ऊईके,व शिक्षकेत्तर कर्मचारी सुनिल कुमरे,विघ्नेश्वर तुपटे,वामन काेटगले, रविंद्र नखाते उपस्थित हाेते.वर्ग ८ वी चे ३२ नवागत विद्यार्थी हजर हाेते.तसेच वर्ग ९ वी व १० वी चे विद्यार्थी हजर हाेते.
या कार्यक्रमात सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष जे.के.ठाकरे तसेच सर्व शिक्षकवृ़द यांनी नवागत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत व सत्कार करून पुस्तके वितरण करण्यात आले.त्यानंतर दहावीचे विद्यार्थी साक्षी तुलाराम इटनकर,पायल सुभाष काळबांधे,प्रतिक्षा हिरामण म्हस्के या विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला.यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले मनाेगत व्यक्त केले. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मनाेगतात सांगितले की, आम्ही पुढे चांगली प्रगती करून शाळेचा व गुरू जणांचा मान वाढवुन शाळेचे आदर्श विद्यार्थी म्हणून जीवन जगू . यानंतर मुख्याध्यापक जे.के.ठाकरे यांनी नवागत तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे संचालन ओ.जी.ऊईके तर आभार भुषण ठाकरे या विद्यार्थ्यांने मानले.