चामोर्शी:- येथील मार्कडादेव रोडवरअसलेल्या शासकीय आयटीआयजवळ अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करताना २३ जून रोजी रात्री गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत एकास अटक केली तर एकाची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल केले. अन्य दोन फरार झाले. आरोपींकडून दारूसह ५ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.चामोर्शी ते मार्कडादेव रस्त्यावर शासकीय आयटीआयजवळ अवैध दारू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.
पोलीस हवालदार नीलकंठ पेंदाम, संजय चक्कावार, सत्यम लोहमबरे, रमेशबेशरा, दिनेश कुथे व मंगेश राऊत यांच्या पथकाने सापळा रचून २३ जूनच्या रात्री २ लाख २४ हजारांची देशी दारू, २ लाख ५० हजारांचे चारचाकी वाहन, ५० हजारांचे दुचाकी वाहन असा एकूण ५ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.ईश्वर सोरते याला अटक करण्यात आली. मोहसीन खान दिलदार खान पठाण ऊर्फ पप्पी पठाण याचा रक्तदाब वाढल्याने गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. तर राहुल गोलाईत व प्रेम आत्राम (रा. चामोर्शी) हे दोघे फरार झाले आहेत. चामोर्शी पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुधीर साठे व सहकारी पोलीस करीत आहेत.