आठवड्यामध्ये वैनगंगा नदीला दुसऱ्यांदा पूर आल्याने ब्रम्हपुरी तालुक्यातील वैनगंगानदी ,नाल्या काठावरील अनेक गावात पुराचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच बांधकाम विभागाचे राष्ट्रीय महामार्ग, ब्रम्हपुरी ते आरमोरी हा महामार्ग देखिल अनेक ठिकाणी वाहून गेला आहे. व हा मार्ग पूर्णतः मागील तीन दिवसापासून बंद झाला आहे. तसेच ब्रम्हपुरी पासून दहा की.मी.अंतरावरील आरमोरी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूट कॉलेजच्या परिसरात पाच ते सहा फुट पाण्याची पातळी गाठली त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. कॉलेजचे रेकॉर्ड, कॉम्प्युटर, प्रिंटर, झेरॉक्स मशीन प्रॅक्टिकल्स साहीत्य, मोटर्स, जनरेटर, इन्व्हर्टर व बरेच साहित्यासह बरीच मोठी नुकसान झाली आहे. त्यामुळे होतकरू गरीब शिकणाऱ्या विध्यार्थ्यांना सुद्धा पुराचा फटका बसणार आहे नव्हे बसला आहे. मागील वेळी सुद्धा अशाच प्रकारे पूर आल्याने मोठया प्रमाणात साहित्याची नासधूस झाली होती.
सदर वैनगंगा नदीच्या पात्रातील पुरामुळे आणि गोसेखुर्द धरणाचं पाणी सोडण्यात आल्याने काही प्रमाणात जीवित हानी तर झालीच पण अतोनात शेतकऱ्याची न भरून निघणारी नुकसान झाली आहे.