कारंजा (लाड) : पूर्वी एकेकाळी एकतर पायदळ किंवा घोडदळ , बैलगाडी, छकडे, डमनी,टांगा इत्यादी वाहनाच्या साधनांनी यात्रा करावी लागायची.त्यानंतर यांत्रीक युगाचा प्रारंभ होऊन सर्वसामान्यांचे प्रवासाचे साधन म्हणजे दुचाकी सायकल निघाले. परंतु अनेकांकडे स्वतःची सायकल देखील नसायची. त्यामुळे मग पाच पैसे ते पंचवीस पैसे तास भाडे आकारून सायकल भाडेतत्वावर देण्यासाठी सायकल दुकाने निघाली होते. आज मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलून घराघरात पेट्रोलवर चालणारी स्वतःची वाहने मोटर सायकल आणि कार,टॅक्सी इत्यादी चार चाकी वाहने आली.
आणि शारिरिक व्यायाम देणारी सायकल सुद्धा काळाच्या ओघात अडगडीत टाकल्या गेली.परंतु आजही जुनी अनेक वयस्क मंडळी सायकलचे अस्तीत्व टिकविण्याचा प्रयत्न करीत असतात. ती वयस्क मंडळी सायकलप्रेमी म्हणून ओळखल्या जातात. त्यापैकी एक मध्य प्रदेशातील बालाघाटचे निस्सिम साईभक्त ओमप्रकाश शेण.यांची बालाघाट मध्ये साईबाबाचे नावावर "बाबा चाय" म्हणून चहा कॅन्टिन असून दरवर्षी ते साईदर्शनार्थ "बालाघाट ते शिर्डी" पर्यत कारंजा मार्गाने सायकल यात्रा करतात.
रविवार दि. 07 जानेवारी रोजी ते दारव्हा मार्गाने कारंजा येत असतांना मार्गात विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे संजय कडोळे, रामबकस डेंडूळे, कैलास हांडे यांनी त्यांचे स्वागत करून चौकशी केली व त्यांना नववर्षाच्या सदिच्छा दिल्या. यावेळी "सबका मालिक एक ! त्यामुळे हिंदु मुस्लिमांनी एकसंघ राहून मानवता धर्माचे पालन करावे.आणि सायकलचे अस्तित्व टिकवून शरिर निरोगी ठेवण्याचा उपदेश त्यांनी दिला." जो आज पेट्रोलच्या गाड्यामागे धावणाऱ्या आजच्या युवकाकरीता आवश्यक असल्याचे आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले आहे.