अकोला : दि.१ मे हा दिवस संपूर्ण विश्वात आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.
... जगभरातील सर्व कामगारांच्या कर्तृत्वाचा उत्सव या निमित्ताने होत असतो..
... प्रत्येक कामगाराला त्याच्या कल्याणासाठी आणि चांगल्यासाठी मिळावे अशा हक्क आणि संधीबद्दल जागरूकता पसरविण्याचा हा दिवस...
... याच दिवशी आपल्या "महाराष्ट्रा" राज्याची निर्मिती झाली असल्यामुळे दि.१ मे रोजी "महाराष्ट्र दिन "म्हणून देखील साजरा करत असतात ...
... या शुभदिनी कामगारांच्या कर्तृत्वाप्रती आपली संवेदना व्यक्त
करण्यासाठी कस्तुरी ने आपातापा येथील भूमिहीन व शेतमजूरी करणारी कामगार महिला सौ. मंदा राजेश वानखडे हिला स्वयंरोजगाराचे साधन म्हणून एक "नविन शिलाई मशीन" देऊन तिचा सन्मान केला..
...त्याचप्रमाणे कु. शारदा पूर्णाजी ढगे ढगे या कामगार कन्येला देखील शिक्षणासाठी आर्थिक मदत रु.५०००/-चा धनादेश देऊन तिचा ही सन्मान केला..
.... वरील कार्यक्रम हा कस्तुरी चे कार्यकारिणी सदस्य मा. श्री. संजय गायकवाड सर यांच्या संकल्पनेतून घेण्यात आला असून त्यासाठी अनेक मान्यवरांनी आर्थिक योगदान दिले.
... कार्यक्रमास प्रा. किशोर बुटोले, संजय ठाकरे, संजय गायकवाड, अनिल पालवे, राजेश्वर पेठकर, वसंतराव खोटरे, प्रा. प्रभाकर पाटील,संजय बुटोले, गोविंदसिंह गहिलोत,दामोदर नुपे, श्रीमती शिलाताई गहिलोत, सौ. संगिता जोध, शारदा चौबे, चेतना आनंदानी, सौ. अपर्णा काळे आदी मान्यवर उपस्थित होते... कस्तुरी...
आपल्या प्रतिक्रिया द्या....