कारंजा : मागील आठवड्यात कारंजा तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने,पंचक्रोशीच्या पोहा, काजळेश्वर,धनज,शहा,उंबर्डा, धामणी इत्यादी अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. तर अनेक गावखेड्यांशी नदी, नाले, पांदण रस्ते यामुळे वहीवाटीचे मार्गही बंद पडलेले होते. त्यामुळे बहुतांश खेड्यापाड्यातील बळीराजाचे अक्षरश: प्रचंड नुकसान झाले असल्याचे प्रथम दर्शनी दिसत असून,अनेक शेतकऱ्याच्या शेतात आजही पाणी असल्याचे चित्र आहे.तर अनेक ठिकाणी पाण्यामुळे पिके खराब होत असल्याच्याही तक्रारी होत्या.या सर्वच ठिकाणी पूरग्रस्त स्थिती असतांना या अगोदर तहसिलदार कुणाल झाल्टे यांनी भेट दिली होती.आता सध्या वातावरण पूर्वपदावर येत आहे .त्यामुळे बुधवार दि.26 जुलै रोजी कारंजा महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे तथा तहसिलदार झाल्टे यांनी परत एकदा धनज मंडलातील राहटी, अंबोडा, नारेगाव, धनज, शहा व अनेक गावखेड्याला भेट देवून नुकसानग्रस्त शेतजमिनीची पाहणी केली.आणि पंचनामा सुरु असल्या बाबत आढावा घेऊन, शक्य तेवढ्या लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे पुर्ण करण्या बाबत क्षेत्रीय यंत्रणेला सुचना केल्या.एकंदरीत मिळालेल्या माहितीवरून,आपल्या कारंजा तालु्याला काळजीवाहू आणि कर्तव्यदक्ष असे उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार मिळाले असल्या बद्दल ग्रामस्थ व शेतकर्याकडूनही समाधान व्यक्त होत असून,त्यांना शासनाचे अर्थसहाय्य मिळण्याची आशा निर्माण झाली आहे .