अकोला शहराच्या अकोला पंचकोशीतील नागरिकांना सांस्कृतिक आणि क्रीडा या क्षेत्राचा लाभ होऊन सांस्कृतिक भवन व क्रीडा भवन तसेच आंतरराष्ट्रीय स्तरातील ,तरण तलाव च्या माध्यमातून आरोग्य तसेच वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध व्हाव्या त या दृष्टीने लोकनेते संजय भाऊ धोत्रे व अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा यांची इच्छापूर्ती तसेच तसेच नाट्यकर्मी राम जाधव यांची अकोल्यात सांस्कृतिक भवन यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी अकोल्यात किडा सांस्कृतिक भवन उभारणी मागणी केली. त्याला मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता घेऊन 15 कोटी रुपये मंजूर केले परंतु प्रस्तावित कामामध्ये बदल करून कामाला ब्रेक लावण्याचा काम प्रयत्न करण्यात आला मध्यंतरी सत्तांतर झाले निधी अभावी काम थांबले परंतु आमदार रणधीर सावरकर यांनी केंद्रीय माजी मंत्री संजय भाऊ धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा यांचा इच्छापूर्ती व अकोलेकरांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा आग्रह लक्षात घेऊन ताबडतोब निधी उपलब्ध करून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारकडे नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे साकडे घातले व कामाला सुरुवात केली काम प्रगतीपथावर असून लवकरच राज्याची मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते लोकार्पण होणार आहे या दृष्टीने कामाला गती देण्यात आली होती आज अचानक आमदार सावरकर यांनी आपले सहकारी खासदार अनुप धोत्रे यांच्यासोबत पाहणी करून तरणतलाव, संस्कृतीक भवन कामाची पाहणी केली व या संदर्भात या दुरुस्ती सुचवल्या होत्या चांगल्या पद्धतीने नाट्यप्रेमी नागरिकांना किडा प्रेमींना सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी व लवकरात लवकर काम व्हावे तांत्रिक बाबीकडे व निधी उपलब्ध करण्या संदर्भात आपण सदैव राज्य शासनाकडे पाठपुरावा करून दिलेले शब्दांची पूर्तता करणार असा विश्वास खासदार अनुप धोत्रे यांनी व्यक्त केला.
आज त्यांच्यासोबत विजय अगरवाल जयंत मसणे, गीतांजली शेगोकार राहुल देशमुख सारिका जयस्वाल संदीप गावंडे विवेक भरणे माधव मानकर योगेश मानकर विठ्ठल गावंडे, आरती ,धोगलिया, पवन महल्ले, एडवोकेट देवाशिष काकड, आदी उपस्थित होते तर सार्वजनिक बांधकाम अभियंता कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील मृणाली ढिगारे अनिल गिरी शैलेश गेडाम यश मालानी किरण देशपांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या संदर्भात कामाला गती देण्यात आली असून लवकरच दोन्ही कामे होणार आहे या संदर्भात नामदार देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले.