अकोला येथील न्यू तापडिया नगर मधील श्रीनाथ गणपती मंदिरात महोत्सव ची सामूहिक भंडारा होऊन सांगता झाली. तसेच कृत्रिम गणपती विसर्जन घाटाची व्यवस्था करण्यात आली होती.
सदर मंदिराची रंगरंगोटी, सजावट, रोषणाई इत्यादी कामे झालीत. आज ६-९-२०२५ रोजी भव्य भंडारा सफल पूर्वक सम्पन्न झाला. यासाठी श्री प्रकाश रेड्डी, अतुल गोंधळेकर, विलास चांदुरकर, शंकर धामोडे, शिवशंकर झामरे, संतोष आखरे, रामकिशन श्रीवास उर्फ लल्ला तसेच सर्व ज्येष्ठ समिती सभासदांनी मार्गदर्शन ,अथक परिश्रम घेतलेत. या सर्वांचा सत्कार अनिल गांधे यांनी पुष्प देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.
दररोज मंदिरात भाविक यांची आरती साठी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मंदिरात नावाचा फलक विवेक जोशी सेवानिवृत्त BDO, टाईल्स अश्विन भाटी आनंद सागर, टाईल्स फिटटींग राम आण्णा मुंग्यालकर, वेल्डिंग चे काम किसन यादव यांनी केलेत.
देणगी दाते यांचे मंडळा तर्फे अनिल गांधे यांनी आभार मानलेत.