कारंजा : येथील स्वर्गीय प्रकाश दादा डहाके निसर्ग पर्यटन केंद्रात सध्या अंतर्गत सौदंर्यरीकरण व रस्त्याची काही किरकोळ कामे सुरू आहे. निसर्ग पर्यटन केंद्रात जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून सद्यस्थितीत रस्ता खोदून पक्का करण्याचे काम सुरू आहे मात्र त्यावर पेवर ब्लॉक टाकून हा रस्ता होणार असल्याचे समजते. पेवर ब्लॉकमुळे या पर्यटन केंद्रात पहाटे फिरायला येणारे जेष्ठ नागरिक पायी फिरतात तसेच युवक सुद्धा धावण्याचा सराव करीत असतात या रस्त्यावर पेवर ब्लॉक लावल्यास अनेकांना पाय व गुडघेदुखीचा त्रास होऊन त्याहून फिरणे शारीरिक दृष्ट्या आरोग्यदायी राहणार नाही करिता हा मुख्य रस्ता पक्का करण्यास कोणतीही हरकत नसली तरी केवळ पेवर ब्लॉकचा वापर कृत्रिम असून पेवर ब्लॉक न टाकता त्याचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित राहावे ही नागरिकांची अपेक्षा आहे तरी सदर रस्त्यावर पेवर ब्लॉक न टाकता रस्ता बनविणे थांबण्यात यावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे उपवनसंरक्षक वाशिम यांना उपवन परिक्षेत्र अधिकारी कारंजा कार्यालयांचे मार्फत करण्यात आले असून सदर निवेदनावर सुरेशराव पोले, ऍड निलेश कानकिरड, दिलीप भोजराज, रवींद्र सोनटक्के, प्रा. विनय कोडापे, श्रीकृष्ण गावंडे विलास त्रिकाडे, प्रा. मधुकर गावंडे, प्रदीप लव्हाळे, हेमंत पापळे डॉ अंकित बियाणी, आनंद इन्नानी, डॉ पोकर्णा, किरण चौधरी,नितीन गावंडे, गोविंद व्यास,यासह अनेक नगरिकांच्या स्वाक्षरी आहेत. असे वृत्त स्वतः ऍड. निलेश कानकिरड यांनी ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांना कळवीले असून पत्रकार संजय कडोळे यांनी सुद्धा वन पर्यटन केन्द्रातील रस्ते ताडोबा अभयारण्याचे धर्तीवर नैसर्गीक ठेवण्याचे आवाहन केले आहे.